विरह कविता
बदलय जग,
म्हणून बदलल्या काही कृती
आता तरी जपा,
आपल्या महाराष्ट्राची संस्कृती
पूर्वी होते काही संस्कार
मुलगी सातच्या आत घरात
पण आता रात्र झालिया पार
अजून मुलगी नाही दारात
पूर्वी होते काही संगोपन
मातीत खेळून गेले बालपण
मोबाइल गेम मुळे,
आता न दिसे शहाणपण
विसरून गेले मातीतले कण कण
पूर्वी होते विचार सगुण
पदर पडे न खांद्यावरून
आता उरलेत कुठे गुण
वेड फॅशनचे लागून
म्हणूनच बदलय जग
पण बदलून देऊ नका अशा गोष्टी
चांगली ठेवा दृष्टी
तरच दिसेल सुंदर सृष्टी....!!
===========================================================
झाड म्हणे सागराला
कधी येईल हा पाऊस
काट कूट अंगावर आमची
पाण्याची ती हाऊस...
ऐकणा तू आमचे
देऊन पाणी तू ओंजळभर
सागर म्हणे झाडाला
कसे देऊ पाणी ओंजळभर
माझ्या लाटांनी जाशील तू वाहूनभर...
सागर म्हणे झाडाला
पाण्यासाठी विचारून बघ नदीला
झाड विचारे नदीला
देशील का पाणी आमच्या मुळाला...
नदी बोले झाडाला
कसे देऊ पाणी तुला थोडे
आमच्या प्रवाहानी
नाही झेपणार तुला एवढे...
नदी म्हणे झाडाला
बोलून बघ वाहत्या झरण्याला
मग झाड विचारे झरण्याला
करशील का ओलेचिंब आमच्या देठाला...
झरणे होईल तयार
पाणी देण्यास देठाला
पण प्रश्न उभे राहील समोर
माझे वळण आणणार कोण तुझ्या वाट्याला...
झरणे संगे झाडाला
एकदा विचारून बघ मानवाला
ओंजळभर पाण्यासाठी
धावून येशील का मदतीला...
झाड म्हणे मग सर्वांना
आधी त्यालाचं विचारले होते
पाण्यावाचून माझ्या फांद्यांना
त्यांनीच वेगळे केले होते
आता संपला माझा खेळ
नाही मानवाकडे वेळ.......!!!
===================================================================
घेतले होते नवीन घर
न घेता कुणाचा पैशापायी आधार
नाही ठेवले डोई कर्जाचा भार
पण काळानेच हिसकावले
त्याचे ते घर दार
आता कुठ गाडी रुळावर होती
त्यात पुन्हा हे अस्सं
होई जीव कासावीस
बांधू घर पुन्हा कस...?
का घेरले काळानी
त्याच्या घर दारास,
केला आयुष्यात त्याच्या
संसाराचा नास,
आता नाही जाई सुखाने ते दिस
आता कुठ गाडी रुळावर होती
त्यात पुन्हा हे अस्सं
रोज रोज घेउनी ती डोळ्यावर आस
आता नाही आधाराला कुणी आस-पास
कधी कधी वाटे घेऊया गळ्याला तो फास
उरला नाही मनात धीर तो जरासं
आता कुठ गाडी रुळावर होती
त्यात पुन्हा हे अस्सं
पण कधी मानली नाही हार
पुन्हा कष्टाने लावला तो जोर
आता कुठ गाडी रुळावर होती
त्यात पुन्हा हे अस्सं
आता कुठं आल त्याच्या चेहर्यावर हास्य
त्याच्या जिद्दीला आमचा तो शाब्बास...!!!
================================================================
असेच संपते दिवस
नाही संपतो तो प्रवास...
कधी होतो तो भास,
नजर भिडते नभास,
हुरहूर लागते जिवास,
नाही कुणाचा सहवास
असेच संपते दिवस
नाही संपतो तो प्रवास... !!धृ!!
जीव तुटका होतो बोलण्यास,
तुला एक वेळ पाहण्यास,
तुझ्या जवळ येण्यास,
आशा राहते ती मनास,
असेच संपते दिवस
नाही संपतो तो प्रवास... !!१!!
लागे जिवास माझ्या ध्यास
तुझ्या साठीच आहे हा श्वास
होतो मनाला तोडा त्रास
कधी डोळ्यावर येईल आस
असेच संपते दिवस
नाही संपतो तो प्रवास... !!२!!
नाही राहिली पर्वा कुणास,
जाऊ सामोरे दुखास
वेगळे करुनी आपल्यास,
आता वाटू लागले जग भकास
असेच संपते दिवस
नाही संपतो तो प्रवास.... !!३!!
============================================================
उभारलेल्या भिंतीवर छत हे मोठे
संकटा पुढे नाही ठेवले,
कधी अश्रुंचे मुखोटे
नेहमी खरे बोलावे शिकवूनी
नाही बोलावे ते खोटे,
चालवले लहानपणी,
पकडून छोटीशी ती बोटे...
आला दिवाळीचा हा सण,
अजून बोनस नाही हाती पण
तरी ठेवले सुखाने मन,
साजरे केले आनंदाने क्षण
आणले पोरांसाठी नवीन कपडे, फटाके
पैशा पायी नाही जीव करुनी तुटके
संकटा पुढे नाही ठेवले,
कधी अश्रुंचे मुखोटे
केले अॅडमिशन मुलांचे
हायफाय कॉलेज मध्ये पाठवूनी,
पैसे उभारले हिमतीचे,
स्वता कष्टा मध्ये झिजूनी
फाटलेल्या बुटामधून,
चालताना आतून खडे ते रुते,
तरी संकटा पुढे नाही ठेवले,
कधी अश्रुंचे मुखोटे
कधी मानूनी ना हार
डोंगर ठेवले नाही कर्जाचे,
शोधूणी मुलीसाठी वर
नाते जोडले विवाहाचे,
सासरी पाठवताना तिला
अश्रु डोळ्यातूनी दाटे
तरी संकटा पुढे नाही ठेवले,
कधी अश्रुंचे मुखोटे....!!!
=================================================================
खूप फिरलो नोकरी साठी,
तरी ठेवला नाही कुणी हात पाठी
सांगू कोणाला ही गोष्ट मोठी,
पण रडत बसलो नाही नदीच्या काठी
घेऊन ते प्रश्न सारे, निघालो आपल्या मार्गाशी,
चाललो घेऊन काही, बळ ते आपल्या पंखाशी,
वाटे न थांबता मागे, झेप घ्यावी आकाशी,
पूर्ण व्हावी इच्छा माझी, हेच सांगणे देवाशी
पेपर मध्ये न्यूज वाचून
apply केली नोकरीची,
पुन्हा मन गेले खचून,
कारण जागा होती फक्त दोघांची
पडलाय मोडून संसार,
खाण्यास अन्न नाही,
एक एक करून पैसा
जमवून भागत नाही
अश्रु साठवून ते डोळ्यात,
जीव घुटमळतो शहरात
जाऊ गावच्या शेतात
उरला पर्याय नाही मनात...!!!
======================================================
विसरलास का रे बाळा?
का पुन्हा सांगावयास लागे
थेंब थेंब साठवून पाणी
तुला दुष्काळामध्ये मी पाजे...
आठवतय का रे बाळा?
तुला शाळेत मी पाठवे
आसवे डोळ्यातले पुसत,
माघारी माझ्यासाठी तू धावे...
लक्षात आहे का रे बाळा?
देई पोळी लाऊन तुपाशी
एकदा आठवून सांग,
कधी ठेवलय उपाशी...
कशाला करतोस असं बाळा
तुला काहीच कसे न आठवे
काय पडले ते कमी,
की तू मला वृद्धा-श्रमात पाठवे...
आई चूक माझ्याकडून घडे
का विसर मला पडे,
माफ आई कर मला
पाणी डोळ्यातुनी दाटे...
आले डोळ्यापुढे माझ्या
फक्त वेडेपणाचे धुके
नाही पाठवणार मी तुला
आता शहाणपण मला सुचे...!!
=========================================================
तुजवीण नाही राहवत आता …!!!
माझ्या मनातला विचार कसा सांगू मी तुला
तूच का नाही येऊन विचारत मला … !!
माझ्या मनात तू ,माझ्या ध्यानात तू
चोहीकडे मला फक्त दिसते तू …!!
तुझे हरिणीचे डोळे ,ते सश्यासारखे रूप
माझ्या रसिक मनाला भावतात खूप…!!
तुझ्यामुळे माझी उडाली आहे झोप
आता मात्र माझी फक्त तूच आहेस होप …!!
बास झाल आता खूप झाला वेळ
चल माझ्या सोबतीला बसवूनी मेळ …!!
माझ्या अपूर्ण मनाला पूर्ण कर आता
नाही नको म्हणू ,तुजवीण नाही राहवत आता …!!!
==========================================================
सोडून जातांना एकदा
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं
थोडं जपायचं होतं.....
पाठ फिरवली मी,
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या
थोडं न्याहाळायचं होतं.....
काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी,
तु कारण ताडायचं होतं. ...
हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....
स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात
एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....
मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...
काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं....
??
=============================================================
विरहयातना
नाही विसरू शकणार कधी
तुला अन तुझ्या आठवणींना
नाही मिटवू शकणार कधी
हृदयात जपलेल्या साठवणींना
हरवलीय तुजवीन जगण्याची चेतना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना ।।ध्रु.।।
न सांगता सोडून गेलीस
अशी अचानक पाठ फिरवलीस
जीव माझा ठेऊन ओलीस
काय मिळाले तुज सांगना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना ।।१.।।
नाही पाठवलीस चिठ्ठी, ना धाडलास निरोप
विसरलीय तहान भूक गमावलीय झोप
नाही पाठवलीस ई-मेल, नाही केलास फोन
तुजवीन सावरे मज दुसरे कोण
सखे, कशा पोहचवू माझ्या भावना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना ।।२.।।
काय चूक झाली माझ्या हातून
सुकलाय कंठ बसलाय दाटून
दिलीस अश्रुंची माळ, गेलय काळीज फाटून
प्रिये कशी विसरलीस सोबतीच्या सोनेरी क्षणांना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना ।।३.।।
स्पंदनात घुमतेय नाव तुझे
डोळ्यांत दिसती भाव तुझे
श्वासांत दरवळे गंध तुझा
हातांवर मखमली स्पर्श तुझा
मिटल्या पापण्यांवर उमटती गुलाबी घटना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना ।।४.।।
नाही विसरू शकणार कधी
तुला अन तुझ्या आठवणींना
नाही मिटवू शकणार कधी
हृदयात जपलेल्या साठवणींना
प्राणप्रिये अधुरा आहे मी तुझ्याविना
ये लवकर नि सावर …
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना ।।५.।।
==========================================================
आज पुनः आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे
जरा वेळ तुझ्या आठवणीत स्वतःला विसरायचे आहे
बघ आज गुलमोहर पुनः बहरला आहे
आपल्या प्रेमाच्या आठवणी ही मनात दाटल्या आहेत
ती सायंकाळची वेळ पुनः आली आहे
आणि तुझ्या गप्पा ही रंगल्या आहेत
वार्याची मंद झुळुक देह स्पर्श करते आहे
तुझ्या केसातल्या गजरा ही दरवळतो आहे
पक्ष्यांचि किलबिल ही एक मधुर संगीत देत आहे
आणि तुझे ते निरागस हसु ही खुलत आहे
सूर्य मावळतीला आला आहे
तुही माझ्या मिठीत हळूच समावत आहेस
तुझ्या बंद डोळ्यात स्वप्न कैद झाली आहेत
घडाळ्यातलि वेळ ही अशीच थांबली आहे
आज पुनः गुलमोहर तर बहरला आहे
पण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......
मनात फक्त आठवाणीच उरल्या आहेत
कारण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......
=================================================
आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!
खरे प्रेम केल्याचे हे फळ......
प्रत्येक प्रेमकरानार्याने जरुर वाचावे...
आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!
रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,
अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्नमी करतो,
हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न
मी करतो,
तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,
सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,
असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
आणि
स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,
खाडकन फुटावे,
कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,
तुझ्यावर येणार्या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो,
तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
माफ़ी मी मागत होतो,
तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,
वेळोवेळी मीच रडत होतो,
तुझ्याकडून झालेली चुक तुला
कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही
किम्मत राहिली नाही,
कामाचा दबाव आहे असे म्हणून,
तू माला टाळत होतीस,
पण या कारणा खाली,
तूच माझ्या पासून दुरावत होतीस,
काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या
साथाची गरज आहे,
तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,
तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर,
हे तर कधीच मिटले नाही,
दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,
तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,
आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,
प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,
पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...आठवण माझीही येइल मी गेल्यावर......
======================================================================
.............||विश्वासावर होतो जीच्या मी||.................
विश्वासावर होतो जीच्या मी
झाली नाही माझी ती
बुडत होती नौका मनाच्या जेव्हा
समोरच होता किनारा तेव्हा
विश्वासावर होतो जच्या मी
झाली नाही माझी ती
वचन काय प्रेमाचे
स्वप्न काय जीवनाचे
भिंती आहेत रेतीच्या
पाडून जाई जो कोणी
जगात आहे सर्व काही
मित्र आहे, विश्वास आहे
तीच कमतरता जीवनात माझ्या राही
विश्वासावर होतो जीच्या मी
झाली नाही माझी ती
अस तर जीवन जगेन
दुःख तरी ही रहाणारच आहे
कमतरता आहे जीवनात जी
ती कमतरता तर रहाणारच आहे....
========================================================
........ || नशीब फटके || ........
जेव्हा बोलावलेस मंदिरात मला
नशीब फाटके माझे भावले मला
गावात फुलांच्या गेलो घारोघीरी
काटे काटेच बोचणारे चावले मला
होता विश्वास तुझ्यावर निघाला फसवा चेहरा
तुझ्या सुखासाठी, सर्वांना दाखवलेस दोषी मला
नव्हते कुणीच जेव्हा आधार द्यायला
माझ्याच आसवांनी समजावले मला
आरोप मी कोणावर करू कसा बरे
आपल्याच सावलीने हुल्कावले मला .....
=============================================================
तुझ्याच साठी
सजलो तुझ्याचसाठी
हसलो तुझ्याचसाठी ||
खेळात रंगतांना
हरलो तुझ्याचसाठी .....
****
नशिबात व्हायचे ते
मी भोगले कधीचे ||
चटके उन्हातले मी
साहतो तुझ्याचसाठी .....
****
जेव्हा कधी तुझ्याशी
वाटे रमून जावे ||
तुडवित खाच खळगे
येतो तुझ्याचसाठी .....
****
जाऊ नको मला तू
सोडून दूरदेशी ||
जे मागतील मजला
देतो तुझ्याचसाठी .....
****
स्वप्नातल्या सुखांना
सजवू नको कधीही ||
प्रत्यक्ष मीच आता
येतो तुझ्यासाठी .....
****
आला वसंत फुलूनी
बहरात यौवनांच्या ||
हृदयातल्या गीतांना
गातो तुझ्याचसाठी .....
===============================================
ऐकनार आसशील तर
आज काही सांगायचय
देणार आसशील तर
आज काही मागायचय
खूप झाले दुरून इशारे
खूप झाले खोटे बहाने
जवळ येऊन आज काही
बोलायचय
ऐकनार आसशील तर
आज काही सांगायचय
प्रेम आहे तुज्यावर व्यक्त आज करायचय झुरतो
तुज्यासाठीच दिवस रात्र ईतकेच
सांगायचय दाखवून तुझ्यावरचे प्रेम
प्रेम तुझ्याकडून मागायचाय
ऐकनार असशील तर
आज काही सांगायचय...
============================================
आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं.....
मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं.....
उपकार केल्यासारखी वागतात काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं.....
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं.....
कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
=================================================
स्वप्नांना रंग देण्याची जिद्द मनात असायला पाहीजे..
दुनियेत पाउल ठेवतांना ताकद शब्दात असायला पाहीजे...
आपल्या प्रितीच माणुस आपल्या जवळुन दुर जाताना त्याचा विरह सहन करण्याची
क्षमता आपल्या काळजात हवी...
नाही सहन होत दुरावा आपल्या प्रितीचा.......
========================================================
आता तुझा एक हि शब्द कानी पडत नाही
जो आवाज तेव्हा सतत सोबत असायचा
आता तोच आवाज जराही जाणवत नाही
जो आवाज तेव्हा सतत सोबत असायचा
आता तोच आवाज जराही जाणवत नाही
माझ्या आयुष्याच्या गणितात,
दुखांचा हिशोब अगदी रास्त होता…..
कारण, होर्पलालेल्या प्रत्येक दुखी क्षणांत,
तुझाच वाट जास्त होता…
==========================================================
तुझ्या आठवणींच्या दुनियेत हरवून जाणं,
जणू काही नियतीनेच ठरवलेलं !
वागण असेल नित्त्याचच,
परंतु, जगण मात्र, तुझ्यातच हरवलेलं !!
=========================================================
मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती..
========================================
आठवतात मला ते सारे दिवस
पाहत बसायचो मी तुला रात्रंदिवस
आजही आहेस तू माझीच
पण ते फक्त आठवणीतच
राहिलो नाही आता तुझा मी
हरवून बसलो भान माझा मी ....
दुसर्या सोबत पाहून थांबले माझे हृदयाचे ठोकेच
पण तुला कदर न त्याची
कारण ह्यावर बोललो न मी कधीच
आज पर्यंत कळले नाही तुला
प्रेम माझे काय होते
कारण तुझ्याच मनात पाप होते
वाटले होते प्रेम मी तुला करत राहील सदा
पण पाहिलेच नव्हते ह्या प्रेमात पडेल
माझ्यावरच गदा
माहित नव्हते तू एवढे मला छलशील
असशील माझ्या मिठीत अन हाथ दुसऱ्याला देशील
स्वप्न पहिले मी तुझ्या संगे राहण्याचे
पण घात तू केलास
बंद माझे डोळ्यांवर वार तू केलास
आठवतात मला ते सारे दिवस
तू बोलायची मी आहे तुझीच
आणि उद्याही राहील
मी हि तुला दिले वचन
तुला कळी सारखे ठेवेल
पण सांग मला काय माझा गुन्हा
खरेच आता सांगेल मी प्रेम न करणार पुन्हा
पाहत बसायचो मी तुला रात्रंदिवस
आजही आहेस तू माझीच
पण ते फक्त आठवणीतच
राहिलो नाही आता तुझा मी
हरवून बसलो भान माझा मी ....
दुसर्या सोबत पाहून थांबले माझे हृदयाचे ठोकेच
पण तुला कदर न त्याची
कारण ह्यावर बोललो न मी कधीच
आज पर्यंत कळले नाही तुला
प्रेम माझे काय होते
कारण तुझ्याच मनात पाप होते
वाटले होते प्रेम मी तुला करत राहील सदा
पण पाहिलेच नव्हते ह्या प्रेमात पडेल
माझ्यावरच गदा
माहित नव्हते तू एवढे मला छलशील
असशील माझ्या मिठीत अन हाथ दुसऱ्याला देशील
स्वप्न पहिले मी तुझ्या संगे राहण्याचे
पण घात तू केलास
बंद माझे डोळ्यांवर वार तू केलास
आठवतात मला ते सारे दिवस
तू बोलायची मी आहे तुझीच
आणि उद्याही राहील
मी हि तुला दिले वचन
तुला कळी सारखे ठेवेल
पण सांग मला काय माझा गुन्हा
खरेच आता सांगेल मी प्रेम न करणार पुन्हा
Good Morning Love Kavita in Marathi - गुड मॉर्निंग मेसेज मराठी - गुड मॉर्निंग फोटो मराठी
ReplyDelete