आईच्या कविता

 

आई

 

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ - तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
असेल - आहे - असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

एका आईची अंतयात्रा

 

आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..
मान खाली घालशील
शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..
किणार्‍यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला
माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही
- तुझी प्रेमस्वरुप आई

माझं दैवत घरात

 

माझं दैवत उभं
माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी
'आशीर्वाद' देण्यास.
माझ्या मना
काहीच कळेना,
विसर मनाला
लागलो वारीला.
वारी-वारी करून
झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल.
सुखाच्या मी शोधात
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत.
देहू-आळंदी झाले
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत.
उशिराने कळुनी
चुकले मनास
'वैभवाचं मंदिर'
त्यावर कळस.
'तुळशीसम' प्रसन्न
सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत
"मना हिरवं रोपटं".
आली दाटुनी
नयनी आसवे,
मन माझे
पोरके झाले.
होतं घरीच दैवत
मी निघत वारीत,
मी निघत वारीत
माझं दैवत घरात.


माझा पाऊस

 

पाऊस सगळ्यांचाच असतो
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस कधीतरी
भोगलेला आहे
झेललेलाही आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे
तिच्या डोळ्यातील
पाऊस
तोच पाऊस
मला आठवतो
तोच पाऊस मला
माहित आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष
अश्रू, हंबरडा
आणि मूक विलाप
माझ्या आईचा
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन
थेंबांचा
आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा

 

फिरी येता परतुनी

 

ओढीने घरट्याच्या
उडे पाखरू सांजेला
मन धावे तुझ्याकडे
कुशी घे ग लेकराला
ढोरं कष्ट उपसुन
जीव थकला भागला
न्हाऊ माखु घाल मज
डोळे आले हे निजेला
मागे लागुन सुखाच्या
जरी गाव मी सोडला
क्षणभर ना मला
तुझा विसर पडला
व्याकुळला जीव माझा
आई तुझ्या ग भेटीला
आठवाने तुझ्या आज
गळा माझा ग दाटला
घाम गाळुन बहुत
जरी पैका हा साठला
कागदाच्या तुकड्याने
लेक आईला मुकला
वाटे सगळे सोडुन
गाव आपला गाठावा
सेवा करताना तुझी
देह मातीत मिळावा
दिस सुखाचे दावण्या
लेक परतून आला
पुरे झाले ते राबणे
थोडा घे आता विसावा
थोडा घे आता विसावा

  ===============

आज यूही बैठे बैठे आंखे भर आई हैं
कहीं से मां की याद दिल को छूने चली आई हैं
वो आंचल से उसका मुंह पोछना और भाग कर गोदी मे उठाना
रसोई से आती खुशबु आज फिर मुंह मी पानी ले आई है
बसा लिया है अपना एक नया संसार
बन गई हूं मैं खुद एक का अवतार
फिर भी न जाने क्यों आज मन उछल रहा है
बन जाऊं मै फिर से नादान्
सोचती हूं, है वो मीलों दूर बुनती कढाई अपने कमरे मे
नाक से फिसलती ऍनक की परवाह किये बिना
पर जब सुनेगी कि रो रही है उसकी बेटी
फट से कहेगी उठकर,"बस कर रोना अब तो हो गई है बडी"
फिर प्यार से ले लेगी अपनी बाहों मे मुझको
एक एह्सास दिला देगी खुदाई का इस दुनियां मे.
जाडे की नर्म धूप की तरह आगोश मे ले लिया उसने
इस ख्याल से ही रुक गये आंसू 
और खिल उठी मुस्कान मेरे होठों पर

खिशातल्या
हजार रुपयांची किंमत
सुद्धा
लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या
एक रुपयापेक्षा
कमीच असते..
================================
मुलगी म्हणजे मायेचा आगर
आहे,मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर
आहे,लहानपणी आई वडिलांचा सांभाळ
करणारी मुलगीच असते,आई बाबांच्या
कामात मद्त करणारी मुलगीच असते,
भावाचं अतूट नातं जपणारी मुलगीच असते,
सासर आणि माहेर यांना प्रेमानं जोड्णारी
मुलगीच असते,आणि शेवट्च्या क्षणी बाबा....
...म्हणून आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा
मुलगीच असते.मुलगी वाचवा,देश वाचवा .
==================================
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
-----तो एक बाप असतो.....
============================
आई कोणिच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज
कुशित घेऊन झोपणार
===========================
मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात
हरवते..!!

========================================
आई बाप्प जिवंत असता नाहि केली तू सेवा...
मग
मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा...
.
बुँदि लाडूच्या पंगती बसवशी...
नंतर तू जेवाया...
..
काया जिझवूनी तूझ्या शिरावर
ठेविली सुखाची छाया...
..
अरेऽ वेड्या
मिळणार नाहि पुन्हा आई बाप्पाची माया...
=========================================
ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर ...मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय
करीन ते
घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात
पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत
असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर
जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले
आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!
====================================
खरे प्रेम आंधळे का असते ?
..
..
..
..
...
..
..
..
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म
होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते.. ♥♥♥
==================================
बोयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंड ला पळूनजाऊन
लग्न करू
म्हणत असताना
गर्लफ्रेंड ने सांगितलेल्या ओळी..
.
.
.
.
.
तुझ्यासाठी मी सर्वकाही सोडलं असतं;
पण
तिचं काळीज कसं दुखवू जी रोज
दरवाज्या जवळ
येवूनमलासांगते
"लवकर घरी ये हा.....मी तुझी वाट
पाहतेय.....
=====================================
आई"म्हणजे भेटीला
आलेला देव,
"पत्नी"म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि"मित्र"म्हणजे
देवाला ही न मिळणारी
भेट....
=========================================

 

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे
" आई"
===================================
नक्की वाचा....
मुलगा: आई! आई! आई!
तु का रडत आहेस?
.
आई: नाय रे बाळा. मि नाहि रडतरे
माझा राजा. .
दुसऱ्या दिवशी,,,
मुलगा: आई! आई! आई!
तु रडत आहेस का?
.
आई: नाय रे पिल्लू , .
मुलगा पुढचा दिवशी आईची पर्स
पाहतो आणि त्यात त्याला एक कागद
सापडतो, त्यात डाँक्टरने लिहिलेलँ असत
की , त्याचा आईला कँसर झालाय
आणि ती काही दिवस जगू शकते ..
(पुढचा दिवशी टिव्हीवर न्युज येते
की पोलिसांना एका मुलगा मृतभेटलाय
आणि त्याचा हातात एक
चिठ्ठी होती ज्यात लिहल होत,
"आई मी स्वत:ला मारलँ आहे
आणि आता स्वर्गात तुझी वाट बघत
आहे..!.!!:'(
===========================
आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी..
आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी.
=========================================
देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला...
.
.
' तुमच्या आयुष्यातून सर्वसुख:
काढून घेतले...आणि विचारलं दुसरं
काही मागा....तर तुम्ही काय मागणार..?? '
.
.
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
.
.
''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने
लिहण्याचा आधिकार मागणार...
.
कारण,
त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख:
काहीच नाहीत..."
==========================================
आई म्हणजे लई भारी !!
आई म्हणजे अगदी छान !!
आई म्हणजे निराळ हास्य !!
आई म्हणजे अनमोल प्रेमाचा खजिना !!
आई म्हणजे त्याग समर्पणाची मूर्ती !!
आई म्हणजे घरावरची सावली !!
आई म्हणजे दैवत !!
आई म्हणजे वात्सल्याचा झरा !!
आई म्हणजे आशिर्वादाचे भांडार !!
आई म्हणजे प्रकाशमय ज्योत !!
आई म्हणजे अनंत सुखाची सावली !!
आई म्हणजे लेकरांचा श्वास !!
आई म्हणजे विशाल हृदयाची मूर्ती !!
आई म्हणजे आनंदाची सरिता !!
आई म्हणजे संस्काराची देवी !!
======================================
आई......
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!
=========================================
डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त
आई......♥♥♥
===========================================
घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत
नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द
राहतात...!
==========================================
दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त .....आई....:)
=========================================
♥ आईचे प्रेम ♥
जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, .............
दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन
जाता आली का ?
ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग
ह्याला कळेल....
बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत
तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत
यायची काय गरज होती.... ?
पण ....... आई
आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस,
माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू
नाही शकला का......
==========================================

जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच
नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर
आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई
म्हणजे सुट्टी....!
==========================================
आई तुझे लेकरू आज खूप एकटे पडले
तुझ्या स्पर्शासाठी ते खूप आज रडले !!
तुझ्या मायेच्या सागराने मला
कधी वादळ तर कधी किनारे दाखवले !!
तुझ्याच छायेत माझे घर असू दे
असे नेहमीच वाटायचे
तू जवळ नसताना मनात काहूर माजायचे !!
आज तुला सोडून मी जगायला शिकतोय
एकटे पडलो इथे सगळेच मला डिवचतात !!
सांगायची तू कथा मी अर्थ आज जाणतोय
नसतो कुणी आपले हे मी खरचं पहातोय !!
जवळ करतात इथे आणि दरीमध्ये सोडतात
जीव कधी जाईल ह्याची ते वाटच पाहतात !!
आई मला घे जवळ मला सोबतच राहू दे
तुझ्याच डोळ्यांनी हे जग मज पाहू दे !!
धन्य झालो मी जी तू मला भेटलीस
असे वाटतं देवांशीच मैत्री मी गाठली .... !!
आई !! तू आहेस माझी आई !!
========================================
आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते.....
किती ग्रेट असतो ना बाप.....!
==========================================
देवाला pratek thikani जाने
जमले नाही...
manun tyni आई
nirman keli
plz lifemadhe kadhihi आईला hert
karu nka karan
आई हे आपलेला देवाकङुन मिळालेले
अनमोलं gift आह
=========================================
आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे
साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे
मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे
दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी, जे
कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून, चालायला शिकवणारी..
आईचं आपले, अस्तित्व घडवणारी..
=========================================
खास करून मुलींनसाठी....
मुलींनो तुम्हाला नम्रंतेची विंनती आहे
कि जर तुमचे
कोणावर प्रेम असेल तरते तुमच्या घरामधील
व्यक्तिबरोबर शेअर करा व
तो मुलगा कितपत तुमचे सांभाल करु
शकतो याचापण विचार करा...
मान्य आहे की प्रेम हे आंधळे असते पण नंतर
पच्छाताप करुन
घेण्यापेक्षा आत्ताच सत्ऱक रहा... कारण पऴून
जाऊन
नाही तुम्ही सुख़ी राहणार
नाही हि घाणेरडा समाज
आईवडीलांना जगु देणार.
तेव्हा तुम्हाला मी हात जोडुन
विंनती करतो कि ज्या आईने आपल्याला 9
महिने
पोटामध्ये ठेऊन जे कष्ट घेतले त्याची परतफेड
म्हणून
त्यांना रडवून आपले स्वप्न पुर्ण करु नका....
==============================================
प्रेम तुझं हे एक मोठे आकाश
काळोखात आहे तू माझा प्रकाश
जमिनी एवढी तुझी माया
उन्हा मधली तू छाया दाखवले तू मला
जग हे रंगीन
नऊ महिने सांभाळले तू मला
सहून वेदना कठीण शिकवले तू जगायला मला
कशे फेडू मी तुझे उपकार
घेऊन जन्म हजारो सुद्धा
भेटणार नाही तुझ्यासारखी आई
तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य
जे आलो जन्माला पोटी तुझ्या
जन्म घेऊन मी झालो धन्य
सदा चरणी राहीन मी आई तुझ्या
=================================================
ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर ...मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय
करीन ते घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर
जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!
===============================================
प्रेम तुझं हे एक मोठे आकाश ,काळोखात आहे तू
माझा प्रकाश,
जमिनी एवढी तुझी माया, उन्हा मधली तू
छाया,
दाखवले तू मला जग हे, रंगीन नऊ महिने
सांभाळले तू मला सहून वेदना कठीण,
शिकवले तू जगायला मला कशे फेडू मी तुझे
उपकार,
घेऊन जन्म हजारो सुद्धा भेटणार
नाही तुझ्यासारखी आई,
तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य जे
आलो जन्माला पोटी तुझ्या,
जन्म घेऊन मी झालो धन्य ,सदा चरणी राहीन
मी आई तुझ्या .......!
==============================================
बाप एक निमित्त असतो;
आपल्या जन्मासाठी;
तर आई एक माध्यम असतं;
परमेश्वराच्या गोड स्वप्नातून जन्मलेलं.
आईच्या श्वासावर तरतो आपण;
आईच्या घासावर जगतो आपण;
एवढं सगळं होउनसुद्धा;
बापावरच्या अन्यायबद्दल बोलतो आपण.
आयुष्यभर बापाच्या नावाची;
पाटी आपण लावतो;
पण कधिही चटका बसल्यावर;
आईचीच आठवण काढतो.
आपल्या सगळ्या संकटांच उत्तरं;
आईजवळ तात्काळ असतं;
बाप बजावतो कर्तव्य फक्त;
त्याला बाकी काही देणं नसतं.
तसं बघितलं तर आई;
आपल्या गाविही कधी नसते;
पण बापापेक्ष्या आईच तुमच्यासाठी;
श्वासास्वासागणिक झुरते.
तुमच्या प्रत्येक दुखाःसाठी;
आईच्या डोळ्यात अश्रू असतो;
बाप मात्र समाजाच्या भीतिने;
आयुष्यभर कोरडच राहतो.
बाप कधी चांगला असतो;
नियमाला अपवाद असल्यासारखा;
पण आयुष्य नियमांनी जगायचं असतं;
अन अपवाद फक्त अभ्यासायचे असतात...
=============================================
आई माझी अशी, खान अमृताची जशी.... 9
महिने 9 दिवस जपले कुशी मद्धे मला क्षण
क्षणा मद्धे ध्यास माझा फक्त
तिला कधी रडली, हसली नाही अश्रू दिले,
मला माझ्या रागातही तिने फक्त
माया दिली ,मला आई
माझी अशी जशी कल्परुक्षाची साउली....
जरी भुललो चुकलो साम्भाडले तिने मला,
जरी दमलो थकलो विसावा तूच दिला,
मला वृक्ष घनदाट केला जोपासून
रोपट्याला वेळो वेळी धावलीस सावरण्या तू
ग मला आई
माझी अशी जशी धीराचा डोंगर.... पंख
आम्हाला तू दिले पार पहाड करण्या भर
उमेदीचा त्यात माळरान ओलांडण्या पंख
मिळाले ग मला आणि उमेदही तुझ्यामुळे कृतघ्न
होऊनिया दूर गेलो समृद्धीकडे आई
माझी अशी सहन शक्ती धरतीची.... परत येईल
घरटी माझ्या परी तुला ठाव मला भास
होतसे जरी चुकलो मी गाव आता अधीर
मी झालो कधी जाणारं परती कधी परत तू
मला मारशील माय-मिठी कधी परत तू
मला मारशील माय-मिठी....
==========================================
मी शिकावं शिकावं ,
नि खूप मोठ व्हाव ,
मनी बाळगून हे सपान ,
त्या काळीत राबणारी ,
माय तूच होतीस ना !,
मी चमकाव चमकाव,
त्या सूर्याच्या समान ,
त्या कडाडत्या उन्हात ,
राबणारी वाघिणी,
माय तूच होतीस ना !,
मी रहाव नेहमी,
त्या गार गार सावलीत ,
अंगार मातीत त्या ,
अनवाणी राबणारी,
माय तूच होतीस ना !,
सुख माझिया जीवनी ,
राहावे नेहमी नेहमी ,
उरी बाळगून हे सपान ,
दुख जन्मभर सोसणारी,
माय तूच होतीस ना !,
काटा रूतता या पायात,
अश्रू उभे तुझ्या डोळ्यात,
मजसाठी दररोज,
त्या काट्यातन चालणारी ,
माय तूच होतीस ना !,
===============================================
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
==============================================
आई : बेटा, माझे डोळे खराब झाले तर तू काय
करशील ???
मुलगा : मी तुला सर्वात चांगल्या डॉक्टर कडे
घेऊन जाईल.....
आई : तरीदेखील डोळे ठीक नाही झाले
तर....???? मुलगा : मी खूप पैसे जमा करेल
आणि विदेशात
घेऊन जाईल
ऑपरेशन साठी...
मुलगा : ....आई जर माझे डोळे खराब झाले तर
तू
काय
करशील ? आई हसत हसत म्हणते, " बेटा,
मी तुला माझे
डोळे देईल ♥ "
==============================================
जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार
अशी ती आई,
इवलेसे बोट धरून चालायला शिकवले,
जिच्या पदरात आपण बालपण घालवले,
जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाही,
अशी ईश्वराचा साक्षात रूप म्हणजे आई,
आभाळापेक्षा उंच जिची माया,
सागराहूनही खोल जिचे प्रेम,
ताऱ्यांपेक्षा अगणित जिचे उपकार,
बाळाचं रडणे ऐकून सुसाट धावत जी जाई,
अशी न संपणारा प्रेमाचा सागर म्हणजे आई..
स्वतः खेळणं बनून अंगाखांद्यावर खेळवले,
हात पकडून अ आ इ ई गिरवायला जिने
शिकवले,
उत्तम संस्कार जिच्यामुळे लाभले,
प्रेमाने पाठ थोपटून गाते जी अंगाई,
अशी दयाची घागर म्हणजे आई...
जिच्या प्रेमाचा कुठेच मोल नाही,
जिच्या आशिर्वादापेक्षा काहीच अनमोल
नाही,
जशी वासराला प्रेमाने चाटते त्याची गाय,
तशी प्रत्येक लेकराला सांभाळते त्याची माय,
कळ लागताच तोंडून निघणारा शब्द म्हणजे
आई...
नजर न लागावी म्हणून काजळ लावणारी आई
असते,
चिमणी कावळ्याची गोष्ट सांगून घास
भरवणारी आई असते,
अपूर्ण असलेला घरचा अभ्यास पूर्ण
करणारी आई
असते,
शाळा सुटल्यावर आतुरतेने आपली वाट
पाहणारी आई असते...
एकटेपणात येणारी आठवण म्हणजे आई,
कधी लाडाने माझा सोन्या म्हणणारी आई
असते,
तर कधी चुक्यांवर रागावणारी आई असते,
आपल्या दु:खात रडणारी सुखात हसणारी आई
असते,
पावसात भिजून आल्यावर पदराने डोकं
पुसणारी आई असते,
जिचा महिमा लिहिण्यास आकाशही कमी पडेल
अशी साठवण म्हणजे आई...
===========================================
|| आई ||
.
.
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
.
.
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
.
.
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं
मन-आधारा च्या पोटी
सारयांना आई च घर दावतं
.
.
आई च्या हाताला
असते चव लई भारी
आई चा हाताने
खाण्याची बातच हो न्यारी
.
.
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
.
.
आई चा राग म्हणजे
बेभान ढगांचा गडगडाट
अवघड असते खुप
तेव्हा सापडणे आपली वाट
.
.
सोसताना वेदना
मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ...
========================================
आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!
आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार
पाणी!!
आई म्हणजे वेदने नंतरची
सर्वात पहिली आरोळी -:
आ ................ई.....
=========================================
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबां बरोबर
जात होती,
एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको..
माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा,
तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक
आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला,
अन अचानक काही झालं,
तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला,
तर मला माहितीये की काहीही झालं
तरी तुम्ही माझा हात कधीच
सोडणार नाही..!!
====================================================

प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात
काहीच
अर्थ नाही...
.
.
.
कारण,
तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार
मिळेल....
.
.
.
पण तुमच्या आई-
बाबा ला तुमच्यासारखा मुलगा/
मुलगी कधीच नाही मिळणार..!!!
एक वेळ विचार करा आणि जास्तीत जास्त
शेअर
करा..!!!
================================================
आई" एक नाव ..,
जगावेगळा भाव ...
"आई" एक जीवन..,
प्रेमळ मायेच लक्षण...
"आई" एक श्वास..,
जिव्हाळ्याची रास...
"आई" एक आठवण..,
प्रेमाची साठवण...
"आई" एक वाट..,
आयुष्यातील सर्वात पहिली गाठ...
"आई" एक गोड नांत..,
बहरणारया जीवनाची हिरवी पात...
"आई" एक.. न संपणारी ठेव..,
जीवापाड जपणारी एकमेव...
"आई" एक घर..,
वात्सल्याची सर...
"आई"...नेहमी तुझ नाव घेताना
नेहमी येतो मला हुंदका..,,
तू दिलेल्या जिवनाच ऋण
फेडू शकेल मी का...
==============================================
!! आईच्या !! गळ्याभॊवती
तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस
पॆक्शाही मॊठा दागिणा आह
============================================
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
=========================================
आई …वेगळीच असते.
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.
डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.
आणि…
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.
खरच... आई किती वेगळी असते. 
=================================================
आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द
टाळी आणी, वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी!
==============================================
ती फ़क्त आईच!!
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच...
===============================================
आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी आणी,
वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी!

 

1 comment: